बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील घटना
By शेखर पानसरे | Updated: September 11, 2024 18:11 IST2024-09-11T18:10:36+5:302024-09-11T18:11:16+5:30
वारंवार अशा घटना घडत आहेत. बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्ही रास्ता रोको करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील घटना
संगमनेर : घराबाहेर धुणे धूत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला, यात ती ठार झाली. संगिता शिवाजी वर्पे (वय ४२, रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.११) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमगाव टेंभी येथील वर्पे वस्तीवर घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वारंवार अशा घटना घडत आहेत. बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्ही रास्ता रोको करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आमच्या पंचक्रोशीतील निमगाव टेंभी, देवगाव, जाखुरी, शिरापूर तसेच इतरही गावांच्या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांचा जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्ही रास्ता रोको करू, असे ग्रामस्थांनी सांगितले.