शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाई मला...नोकरीवाला नवरा हवा गं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 05:24 IST

शेती करणाऱ्या मुलगा असेल तर मुली साफ नकार देऊ लागल्याने एक नवीच समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.

- अरुण वाघमोडे अहमदनगर : वंशाला दिवाच हवा, या भाबड्या समजुतीमुळे मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी झाली असतानाच; बदलत्या जीवनशैलीमुळे उपवर मुलींच्या अपेक्षा वाढल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे महाकठीण होत असल्याचे वास्तव सध्या ठळकपणे दिसू लागले आहे. शेती करणाऱ्या मुलगा असेल तर मुली साफ नकार देऊ लागल्याने एक नवीच समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.एकेकाळी मुलीला अपेक्षित नवरदेव शोधण्यासाठी तिच्या माता-पित्यांना मोठा आटापिटा करावा लागायचा़ चांगला मुलगा मिळालाच तर त्याच्या अवास्तव अपेक्षा असायच्या़ लेकीच्या चांगल्या भविष्यासाठी तिचा पिता मुलाची सर्व हौसमौज पूर्ण करायचा़ गेल्या काही वर्षांत मात्र ही परिस्थिती पूर्ण बदलून गेली आहे़आता मुलींना हुंडा देऊन लग्न करण्याची वेळ मुलांवर आली आहे़ त्यातही मुलगा नोकरीवाला अन् सुस्थापित असेल तरच मुलगी लग्नाला तयार होतात. किती एकर शेती आहे आणि त्यातून किती उत्पन्न येते, याचा अजिबात विचार केला जात नाही. दुसरीकडे शहरात नोकरी आणि खोली असेल तर अशा मुलाला ताबडतोब होकार मिळतो. यामुळे शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य मुलांची लग्ने जमविणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे.नगर जिल्ह्यात १ हजार पुरुषांमागे ९०८ महिला असे प्रमाण आहे़ महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे़ एकतर मुलींची संख्या कमी शिवाय शिक्षणाचे वाढते प्रमाण, बदललेली जीवनशैली, जोडीदार निवडताना वाढलेल्या अपेक्षा आदी कारणांमुळे मुलांना नाकारले जात आहे़ अल्पसंख्याक समाजासह मराठा व इतर अठरा पगड समाजामध्ये सध्या असेच चित्र आहे.मुलगी सावळी अन् शिक्षणाने कमी असेल तर मुले अशा मुलींना नकार द्यायचे. आता मुली अशामुलांना नकार देत आहेत़ मुलगी नोकरीला असेल तर ती मुलगा नोकरीवालाच शोधते़ मराठा सेवा संघाच्या वधू-वर सूचक मंडळातंर्गत गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या सर्व्हेत २५ पेक्षा जास्त वय असलेल्या ४० टक्के मुलांचे विवाह झालेले नाहीत, असे आढळून आले आहे.>काय आहेत ‘ती’च्या अपेक्षा?मुलाला चांगल्या पगाराचीनोकरी असावीत्याचे स्वत:चे शहरात घर असावेशेतकरी मुलगा नकोमुलाकडे स्वत:ची कार असावी

टॅग्स :marriageलग्न