नगरमध्ये डेंग्यूच्या आजाराने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:40 IST2019-12-11T14:39:33+5:302019-12-11T14:40:08+5:30
अहमदनगर शहरातील कोठी परिसरात राहणाºया एका महिलेचा डेंग्यू सदृश आजाराने बुधवारी एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

नगरमध्ये डेंग्यूच्या आजाराने महिलेचा मृत्यू
अहमदनगर : शहरातील कोठी परिसरात राहणा-या एका महिलेचा डेंग्यू सदृश आजाराने बुधवारी एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुजाता सुरेश मकासरे (वय ५४) असे या निधन झालेल्या महिलेचे नाव आहे.
सुजाता या डेंग्यू सदृश्य आजाराने काही दिवसापासून आजारी होत्या. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वारंवार मागणी करुन देखील कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. कोठी येथे अनेक भागात अस्वच्छता पसरली असून, उघड्यावरच्या गटारी देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक घरांमध्ये डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत.