शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री विखे यांच्या मध्यस्थीने कोपरगाव येथील उपोषण मागे

By सचिन धर्मापुरीकर | Updated: September 16, 2023 00:54 IST

पाचव्या दिवशी रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते सोडले उपोषण...

कोपरगाव (जि.अहमदनगर) : मराठा आरक्षणासाठी कोपरगाव येथे सोमवार (दि. ११) पासून सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी शुक्रवारी रात्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मध्यस्थीने प.पु. रमेश गिरी महाराज महाराज यांच्या हस्ते मागे घेण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत यांनी सोमवारपासून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज  स्मारकासमोर उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. रात्री सव्वा नऊच्या सुमारास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री विखे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येथील तीन जणांनी उपोषण सुरू केले होते. राज्य शासन आरक्षणाच्या बाजूने आहे.

सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे यासाठी कायदेशीर बाजू अभ्यासपूर्णरित्या मांडण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे अशी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी विनंती मान्य करावी व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती विखे यांनी केली. तर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शासनाकडे उचित कारवाईसाठी आपल्या मागण्या पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे अशी विनंती केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार संदीप कुमार भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी आमदार स्नेहलात कोल्हे, अॅड. शंतनू धोर्डे, राजेंद्र जाधव, विकास आढाव, दत्ता काळे, कैलास जाधव, संदीप देवकर, कृष्णा आढाव, मुकुंद इंगळे ,प्रशांत वाबळे, मनोज नरोडे, हिरालाला महानुभव, वीरेन बोरावके, मनोज कडू, बाळासाहेब रुईकर, मांडर पहाडे, बबलू वाणी, विनायक गायकवाड, केशव भवर, शैलेश साबळे, सचिन सावंत, अमित आढाव, जनार्धन कदम, सुनील देवकर, वैभव आढाव,वाल्मिक लहिरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाKopargaonकोपरगाव