पक्षासाठी अविरत काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:14 IST2021-02-22T04:14:11+5:302021-02-22T04:14:11+5:30

बेलापूर : माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात महिला मंडळापासून झाली. त्यानंतर विधिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. राजकीय जीवनात अनेक चढउतार ...

Will work tirelessly for the party | पक्षासाठी अविरत काम करणार

पक्षासाठी अविरत काम करणार

बेलापूर : माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात महिला मंडळापासून झाली. त्यानंतर विधिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. राजकीय जीवनात अनेक चढउतार अनुभवले. प्रसंगी पराभवही पत्करावा लागला. मात्र, हार न मानता पक्षासाठी काम करत राहिले, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

भाजपच्या बुथ संपर्क अभियानाअंतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय सांस्कृतिक भवन येथे रविवारी आयोजित बैठकीत कोल्हे बोलत होत्या. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, भाजपचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, भाजप नेते सुनील मुथ्था, सुनील वाणी, सतीश सौदागर, प्रफुल्ल डावरे उपस्थित होते.

पक्षाने बुथ संपर्क अभियानाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. ती आनंदाने स्वीकारून झोकून देऊन कामाला सुरुवात केली आहे, असे कोल्हे म्हणाल्या. शहरातील मुस्लिम बांधवांनी राममंदिर बांधकामासाठी दिलेल्या ५१ हजार रुपयांच्या निधीचे कोल्हे यांनी कौतुक केले.

याप्रसंगी सुनील दिवटे, विशाल अंभोरे, मोहसीन सय्यद, राकेश कुंभकर्ण, किशोर खरोटे, जनार्दन शिंदे, भास्कर कोळसे, नितीन नवले, स्वप्नेश बोरा, अरविंद साळवी, सचिन कणसे, अशोक आव्हाड, छाया आव्हाड, माधुरी ढवळे, प्रशांत मुंडलिक आदी उपस्थित होते.

Web Title: Will work tirelessly for the party