पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST2021-01-09T04:16:56+5:302021-01-09T04:16:56+5:30

जामखेड : येथील पत्रकारांचे विविध प्रश्न रोहित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे, अशी ग्वाही बारामती ॲग्रोच्या ...

Will try to solve the questions of journalists | पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

जामखेड : येथील पत्रकारांचे विविध प्रश्न रोहित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे, अशी ग्वाही बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दिली.

जामखेड येथे पत्रकार दिनानिमित्त सृजन फाऊंडेशनमार्फत पत्रकारांचा सहकुटुंब स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, डॉ. राजेश मोरे, संजय सस्ते, ओम कट्टे, पत्रकार दत्तात्रय वडे, कल्याणी नागोरे, नासीर पठाण, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, प्रकाश खंडागळे,अविनाश बोधले, मोहिद्दीन तांबोळी, दीपक देवमाने, दत्तात्रय राऊत, संदेश हजारे, संतोष थोरात, दत्तराज पवार, ओंकार दळवी, सत्तार शेख, लियाकत शेख, यासीन शेख, पप्पुभाई सय्यद, नंदूसिंग परदेशी, किरण रेडे, पिंटू औचरे, धनंजय पवार, रोहित राजगुरू आदी उपस्थित होते.

Web Title: Will try to solve the questions of journalists