शिलेदारांची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:52+5:302021-09-03T04:21:52+5:30
कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्या सर्व आघाड्या तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) रात्री गोपाळकाला दहीहंडी महोत्सव ...

शिलेदारांची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्या सर्व आघाड्या तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) रात्री गोपाळकाला दहीहंडी महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी कोल्हे बोलत होते.
यावेळी वैष्णवी अहिरे, युवराज लटके, भाग्यश्री सोनवणे या गरजू रुग्णांना प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या मदतीचे वितरण विवेक कोल्हे, हभप लोहाटे महाराज, सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, दिलीप दारुनकर, विजय वाजे, विजय आढाव, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, विनोद राक्षे यांच्याहस्ते करण्यात आले. शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कोल्हे म्हणाले, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनातून युवकांचे संघटन वाढवून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या संघटनात प्रामाणिक शिलेदारांचे मोल मोठे आहे. त्यामुळेच प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, राजकीय या पातळीवरील कार्य तडीस जाते.
सिद्धार्थ साठे यांनी आभार मानले. याप्रसंगी नारायण अग्रवाल, गोपी गायकवाड, पिंकी चोपडा, सिध्दार्थ साठे, रोहित कनगरे, वासू शिंदे, सागर राऊत, गौरव येवले, अशोक लकारे, फकीर महंमद पहिलवान उपस्थित होते.