जवळेत योग प्रशिक्षण सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:26+5:302021-02-05T06:36:26+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत योग प्रशिक्षण ...

जवळेत योग प्रशिक्षण सुरू करणार
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील आरोग्य उपकेंद्रात कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत योग प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.२१) योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली.
योगशिक्षक रवींद्र कोल्हे म्हणाले, आपल्या देशाला योगाची फार मोठी देणगी मिळाली आहे. नागरिकांनी योगाची प्रात्यक्षिके शिकून घ्यायला हवीत. त्याचा दूरगामी परिणाम दिसून येतो. योगामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार दूर होऊ शकतात. तसेच मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही याचा फायदा होईल.
आरोग्य उपकेंद्राच्या प्रमुख डॉ. सुप्रिया कारखिले म्हणाल्या, कोरोनाच्या पूर्वीपेक्षा कोरोनानंतर पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढली. जवळे गावातील महिला, पुरुष, तरुणांनी योग शिबिरात माेठ्या प्रमाणावर सहभाग घेतला तर येथे पहाटे दररोज सहा ते सात या वेळेत योगाचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कल्पना पठारे, अंगणवाडीसेविका संगीता विश्वासराव, धर्मनाथ विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.