शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नाही : आमदार संग्राम जगताप यांचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:01 IST

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा आ. जगताप यांनी घेतला असल्याचे त्यांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आ. जगताप यांचा कोठडीतील मुक्काम सध्या तरी लांबल्याचे दिसते.

ठळक मुद्देवकिलांनी दाखल केलेला जामीन अर्ज घेतला मागे

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा आ. जगताप यांनी घेतला असल्याचे त्यांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आ. जगताप यांचा कोठडीतील मुक्काम सध्या तरी लांबल्याचे दिसते.केडगाव येथे दि. ७ एप्रिल रोजी दुहेरी हत्याकांडानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीवरून आ. संग्राम जगताप यांच्यावर हत्येचा कट असल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याच रात्री त्यांना अटकही झाली. बारा दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना बुधवारी (दि. १८) न्यायालयीन कोठडीत वर्ग करण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे दि. २५ एप्रिल रोजी जगताप यांचे वकील अ‍ॅड. महेश तवले यांनी त्यांचा जामीन अर्ज न्यायालयासमोर ठेवला. परंतु या प्रकरणी पोलिसांचा अहवाल न आल्याने सरकारी वकिलांनी या संदर्भात आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे या जामीन अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, संग्राम जगताप गेले २० दिवस अटकेत असून पोलिसांना अद्यापपर्यंत त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल कोतकर यानेही या हत्येत कोणत्याही राजकीय नेत्याचा सहभाग नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आपला संबंधच नाही. त्यामुळे कसले पुरावेही नाहीत. पोलिसांनी आणखी तपास करावा. न्यायालयावर आपला विश्वास आहे. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा घेत आ. जगताप यांनी जामीन अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचे त्यांचे वकील तवले यांनी स्पष्ट केले.पोलीस अहवाल पुढील आठवड्यातआमदार शिवाजी कर्डिले यांना जामीन मिळाल्यानंतर संग्राम जगताप यांनाही जामीन होईल, अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. परंतु आता संग्राम जगताप यांनीच जामीन अर्ज मागे घेतल्याने सध्या तरी त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस त्यांचा अहवाल पुढील आठवड्यात देणार असल्याची माहिती आहे. त्यात आ. जगताप यांचा याप्रकरणी सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले तर त्यांना जामीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडsangam chowkसंगम चौक