वाईन शॉपला परवानगी दिल्यास आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:31+5:302021-08-20T04:25:31+5:30

अकोले रस्ता येथील सावतामाळी नगर परिसरात वाईन शॉप स्थलांतर करण्याची परवानगी मागण्यात येत आहे. येथे १९८८ सालचे धर्मादाय आयुक्तांकडे ...

Will agitate if the wine shop is allowed | वाईन शॉपला परवानगी दिल्यास आंदोलन करणार

वाईन शॉपला परवानगी दिल्यास आंदोलन करणार

अकोले रस्ता येथील सावतामाळी नगर परिसरात वाईन शॉप स्थलांतर करण्याची परवानगी मागण्यात येत आहे. येथे १९८८ सालचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेले विठ्ठल मंदिर आहे. येथे भाविक नित्याने दर्शन आणि पूजेसाठी येतात. हरिपाठ आणि कीर्तन होते. प्रत्येक एकादशीला उत्सव साजरा केला जातो. अखंड हरिनाम सप्ताहाचेदेखील आयोजन करण्यात येते. तसेच संबंधित वाईन शॉप स्थलांतरित प्रस्तावाच्या जागेशेजारी कादर बादशहा कादरी मस्जिद (ट्रस्ट क्रमांक बी १४७) इदगाह रस्ता, सावतामाळी नगर, संगमनेर ही मस्जिद आहे. येथे मुस्लीम बांधवांचे नमाज पठण होत असते. येथे नागरी वसाहत असून येथील रहिवाशांचा वाईन शॉप सुरू करण्यास तीव्र विरोध आहे. परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तसेच नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता. वाईन शॉपला परवानगी देऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे.

--------------------

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहमदनगर येथील वरिष्ठ अधिकारी संगमनेरात आले असता त्यांची या संदर्भाने भेट घेतली. शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीच्यावतीने त्यांना दिलेल्या निवेदनाची योग्य चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दारू आणि इतर कोणत्याही व्यसनांनी तरुणांचे आयुष्य खराब होते.

-अमर कतारी, शिवसेना शहर प्रमुख, संगमनेर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती

Web Title: Will agitate if the wine shop is allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.