नागवडे कारखान्यावर मुख्य अभियंता धुमाळ यांचा सपत्नीक सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:29+5:302021-09-13T04:20:29+5:30
काष्टी : श्रीगोंद्याचे भूमिपुत्र हेमंत धुमाळ यांची जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंतापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागवडे ...

नागवडे कारखान्यावर मुख्य अभियंता धुमाळ यांचा सपत्नीक सन्मान
काष्टी : श्रीगोंद्याचे भूमिपुत्र हेमंत धुमाळ यांची जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंतापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागवडे साखर कारखान्यावर अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी नागवडे म्हणाले, हेमंत धुमाळ यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील घोड, कुकडीचा पाणीप्रश्न मार्गी लागण्यास निश्चित मदत होईल. धुमाळ म्हणाले, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबीयांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विशेषतः ज्येष्ठ बंधू पांडुरंग धुमाळ यांच्या सहकार्याने आयुष्यात मोठी मजल मारता आली.
यावेळी अनिता धुमाळ, सेवानिवृत्त अभियंता पांडुरंग धुमाळ, कारखान्याचे संचालक अरुण पाचपुते, विलास काकडे, विजय कापसे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सखाराम निंबाळकर, दादासाहेब कुरुमकर, झुंबर रोडे, कारखान्याचे सचिव बापूराव नागवडे, स्थापत्य अभियंता एस.जी. कुलांगे उपस्थित होते. सुभाष शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संचालक ॲड.अशोक रोडे यांनी आभार मानले.
----
१२ श्रीगोंदा धुमाळ
हेमंत धुमाळ यांचा नागवडे कारखाना येथे राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.