शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धोंड्यात ५ तोळे सोन्याच्या चेनसाठी पत्नीवर अत्याचार; मुंबईतील घटना; नगरमध्ये पतीसह दिरावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:35 IST

या महिलेने माहेरी अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

अहमदनगर : धोंड्याला पाच तोळ्यांची सोन्याची चेनच पाहिजे, अशी मागणी करीत पत्नीवर नवरा व दिराने सामूहिक अत्याचार केला. तसेच या अत्याचाराचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. या महिलेने माहेरी अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नगरमधील या २१ वर्षीय तरुणीचे मुंबई येथील तरुणाशी मे महिन्यात लग्न झाले होते. मुलीच्या वडिलांनी लग्नात दहा तोळे सोने दिले. लग्नानंतर चार दिवसांनंतरच विवाहितेचा छळ सुरू झाला. फर्निचर बनविण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यास तिने नकार दिल्यामुळे पती व दिराने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे. धोंड्यात मला पाच तोळ्याची सोन्याची चेन पाहिजे, अशी मागणी पतीने केली. त्यालाही महिलेने नकार दिला. त्यामुळे पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहितेला हँगरने मारहाण केली. शुक्रवारी पतीने धोंड्याच्या कारणावरून महिलेशी वाद घातला. त्यावेळी पती व दिराने विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत पती व दीर महिलेला घेऊन बेडरूममध्ये गेले. तेथे दोघांनी महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. घडलेला प्रकार जर कुणाला सांगितला तर अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली, असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पती व दीर यांच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर