कोणी हात देता का हात !
By Admin | Updated: June 30, 2016 01:18 IST2016-06-30T01:12:02+5:302016-06-30T01:18:22+5:30
बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा परिवाराचा पोशिंदा व विश्वदारिद्र्याशी झुंज देणारे श्रीगोंद्याच्या औटीवाडीतील अशोक रामा तुपे यांचे दोन्ही हात विजेचा धक्का बसून निकामी झाल्याने चूल कशी पेटवावी

कोणी हात देता का हात !
बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा
परिवाराचा पोशिंदा व विश्वदारिद्र्याशी झुंज देणारे श्रीगोंद्याच्या औटीवाडीतील अशोक रामा तुपे यांचे दोन्ही हात विजेचा धक्का बसून निकामी झाल्याने चूल कशी पेटवावी अन् मुले कशी शिकवावीत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन्ही हात खांद्यापासून काढल्याने अशोकच्या जीवनाची धडपड शांत झाली. कृत्रिम हात बसविण्यासाठी सुमारे तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. भूमिहीन अशोक यांच्यावर आई, वडील, पत्नी, दोन मुले अवलंबून आहेत. अशोक एका ठेकेदाराकडे लाईनमनचे काम करत होते. सहा महिन्यांपूर्वी रांजणगाव गणपती येथे काम करताना विजेचा धक्का बसून जखमी झाल्याने त्यांचे हात खांद्यापासून काढण्याची दुर्दैवी वेळ आली. दोन्ही हात निकामी झाल्याने अशोकचे जीवन परावलंबी झाले. ते स्वत: जेवणसुध्दा करू शकत नाही. आई- वडील थकले आहेत. किरण व रूपेश ही मुले शाळेला. पत्नी लताबाईला अशोक यांच्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कुटुंबासाठी रोजी रोटी कोण कमविणार व दैनंदिन गरजा कशा भागविणार? असे प्रश्न या कुटुंबासमोर आहेत. ४
साहेब, माझ्यावर सहा माणसांचे कुटुंब अवलंबून आहे. दोन चिलीपिली शाळेत आहेत. आई- वडील थकले. पत्नीचे हात खुंटले आहेत. आता आमची चार चार दिवस चुलच पेटत नाही. मला कोणी हात देता का हो हात...! त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही, असे सांगताना अशोक यांनी हंबरडाच फोडला. पत्नी लताबाई हाय मोकलून रडली अन् अचानक वातावरण सुन्न झाले.