पोलिसांनी पकडलेली दोन ट्रक तूर कुणाची?

By Admin | Updated: May 3, 2017 19:32 IST2017-05-03T19:32:21+5:302017-05-03T19:32:21+5:30

तुरीच्या पोत्यांनी भरलेल्या दोन ट्रक मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत़

Who is the police truck to catch two trucks? | पोलिसांनी पकडलेली दोन ट्रक तूर कुणाची?

पोलिसांनी पकडलेली दोन ट्रक तूर कुणाची?

आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ ३ - शेवगाव-पाथर्डी रोडवर तुरीच्या पोत्यांनी भरलेल्या दोन ट्रक मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत़ ही तूर नेमकी शेतकरी, व्यापारी की, पाथर्डी बाजार समितीची याचे गौडबंगाल अद्याप उलगडले नसून पोलिसांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन माहिती मागितली आहे़
पाथर्डी रोडवरून संशयितरित्या दोन ट्रकमधून तूर वाहून नेत असल्याची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती़ माहिती नुसार पथकाने घटनास्थळी जाऊन त्या दोन्ही ट्रक ताब्यात घेतल्या़ या ट्रकमध्ये सरकारी बारदान्यात तूर भरलेली असल्याचे आढळून आले़ ही तूर नेमकी कोठे भरली आणि कुठे नेण्यात येत होती़ याबाबत विचारणा केली असता़ ट्रकसोबत असलेल्या व्यक्तींना माहिती सांगता आली नाही़ त्यामुळे या ट्रक एमआयडीसी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या आहेत़ पोलिसांनी नाफेडच्या मार्केटिंग अधिकाऱ्याला पत्र दिले असून, याबाबत माहिती देण्याचे सांगितले आहे़ याबाबत मार्केटिंग अधिकारी मगेर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, या तुरीबाबत माहिती घेण्यासाठी पाथर्डी बाजार समितीला पत्र दिले असून, गुरूवारी याबाबत माहिती येणार आहे़
तूर खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप
पाथर्डी येथील तूर खरेदीत अपहार होत असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे़ यामध्ये पाथर्डी बाजार समितीच्या संचालकांनी नाफेडचा बारदाना बाहेर नेऊन शेतकऱ्याचा माल असल्याचे दाखवून व्यापाऱ्याकडील तूर खरेदी केली आहे़ तसेच ही तूर भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये खाली केली जाते़ याबाबत योग्य ती चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ पोलिसांनी पकडलेली तूर याच गैरव्यवहारातील असल्याची चर्चा सध्या पाथर्डीत आहे़ नाफेड अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यानंतर या तूर प्रकरणाचे भिंग फुटेल़

Web Title: Who is the police truck to catch two trucks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.