वैद्यकीय बिल, रजेचा अर्ज अडलाय कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:45+5:302021-02-25T04:25:45+5:30
अहमदनगर : वैद्यकीय बिल मंजूर झाले नाही, रजेचा अर्ज संबंधित विभागात पोहोचलाच नाही यासह वेतनवाढ, पदोन्नती, वेल्फेअरसंबंधातील काम ...

वैद्यकीय बिल, रजेचा अर्ज अडलाय कुठे?
अहमदनगर : वैद्यकीय बिल मंजूर झाले नाही, रजेचा अर्ज संबंधित विभागात पोहोचलाच नाही यासह वेतनवाढ, पदोन्नती, वेल्फेअरसंबंधातील काम अशा वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रारी दिवसभरात जिल्हाभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस समाधान हेल्पलाईनकडे करतात. या तक्रारींची तत्काळ दखल घेत अवघ्या २४ तासांच या तक्रारींचे निराकरण करून तक्रारदारांचे समाधान केले जात आहे.
कार्यालयीन कामकाजासंदर्भात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयांत वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. यातून वेळ आणि खर्चही वाया जात होता. यावर उपाय म्हणून राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात २०१६ पासून समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षभरात येथील समाधान हेल्पलाईनकडे २५८ तक्रार आल्या तर जानेवारी व २४ फेब्रुवारी अखेर ४६ तक्रार आल्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील समाधान हेल्पलाईन कक्षात सहायक फौजदार सुनील गाडळकर व कॉस्टेबल तेजश्री दारकुंडे समन्वयक म्हणून काम पाहातात. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर अधीक्षक कार्यालयातील संबंधित विभागात त्या तक्रारीबाबत माहिती घेऊन काम मर्गी लावले जाते. रजेसंदर्भात सर्वाधिक तक्रारी हेल्पलाईनकडे येतात.
---------------------------------------------------
तक्रारीच्या दिवशीच समाधान
बहुतांशी जणांची किरकोळ तक्रार असते. त्यामुळे मात्र पुढील काम अडकून पडते. अशा तक्रारी हेल्पलाईन कक्षाकडून पाठपुरावा करून त्याच दिवशी मार्गी लावल्या जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या तक्रारींचा आढावा घेतला जातो त्यामुळे एकही तक्रार प्रलंबित राहत नाही. यातून पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण राहते. असे नियंत्रन कक्षाचे पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले.
---------------------------------------------
जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकीवेळी अधीक्षक कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे काम अडले तर ते हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवितात. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उप अधीक्षक प्रांजल सोनवणे, जिल्हा विशेष शाखेचे निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व तक्रारींचे निराकरण केले जाते.
-सुनील गाडळकर, सहायक फौजदार
- तेजश्री दारकुंडे, कॉस्टेबल, समाधान हेल्पलाईन कक्ष
---------------------
वर्षभरात तक्रारी २५७
सर्व तक्रारींच निवारण
फोटो २४ हेल्पलाईन १,२,३,