सुनियोजित शिर्डी वसवावी

By Admin | Updated: June 16, 2014 00:08 IST2014-06-15T23:33:47+5:302014-06-16T00:08:48+5:30

शिर्डी : मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशात नवीन शंभर शहरे वसवणार आहे़ त्याच धर्तीवर नवीन व सुनियोजित नवीन शिर्डी वसवण्याची संकल्पना शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे

Well planned Shirdi Vasawavi | सुनियोजित शिर्डी वसवावी

सुनियोजित शिर्डी वसवावी

शिर्डी : मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशात नवीन शंभर शहरे वसवणार आहे़ त्याच धर्तीवर नवीन व सुनियोजित नवीन शिर्डी वसवण्याची संकल्पना शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडली़ सभामंडपाऐवजी पाणी अडवा व पाणी जिरवा यासाठी आपण केंद्राकडून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़
रविवारी (दि़ १५) साईनगरीतून लोखंडे यांनी कामकाजाचा श्रीगणेशा केला आहे़ साईसंस्थानच्या सभागृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी येथील समस्या जाणून घेतल्या़ यावेळी कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे, उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेना तालुका प्रमुख कमलाकर कोते, नितीन कापसे, संजय शिंदे, सचिन कोते, विनोद संकलेचा, सचिन शिंदे, सुरेश आरणे, मच्छिंद्र गायके आदींची उपस्थिती होती़
संस्थानने २००५ पर्यंतच्या कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे़ त्याऐवजी रेल्वे प्रकल्पग्रस्तांसह २००७ पर्यंतच्या २३०० कामगारांचा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना लोखंडे यांनी केली़ ३७६ घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संस्थानची जागा नगरपंचायतकडे हस्तांतरित करणे, समाधी शताब्दीच्या कामांना गती येण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीसाठी तसेच थेट धरणातून पाईपने पाणी आणण्याच्या प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करु, अशी ग्वाही देतानाच लोखंडे यांनी पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांच्याशी या प्रकल्पाबाबत चर्चाही केली़
शहरात सिमेंटऐवजी पेवरब्लॉकचे रस्ते करावेत, प्रलंबित असलेल्या व गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या तलाठी कार्यालयाचे काम त्वरित सुरु करावे, शहरातील सबस्टेशनची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव पाठवावा, शहरात केबलसाठी खोदलेले रस्ते तीन दिवसात दुरुस्त न झाल्यास नगरपंचायतने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या़
साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन समितीत तसेच साईसमाधी शताब्दीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या समितीत केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी खासदार लोखंडे यांचा समावेश करावा यासाठी सेना-भाजपाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कमलाकर कोते व राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले़
(वार्ताहर)

Web Title: Well planned Shirdi Vasawavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.