विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:22 IST2018-08-24T18:21:56+5:302018-08-24T18:22:01+5:30
तालुक्यातील सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या गुरूवारी मध्यरात्री विहिरीत पडला होता. शुक्रवारी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर वनकर्मचाºयांना पाचारण करण्यात आले होते.

विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप काढले बाहेर
संगमनेर : तालुक्यातील सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या गुरूवारी मध्यरात्री विहिरीत पडला होता. शुक्रवारी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर वनकर्मचाºयांना पाचारण करण्यात आले होते.
सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील परिसरातील गट क्रमांक ३७ मध्ये कुंडलिक दादाभाऊ दुधवडे यांच्या मालकीची विहिर आहे. या विहिरीची खोली सुमारे ७० फुट असून त्या लगतच सोमनाथ शंकर दुधवडे यांचा मेढ्यांचा वाडा बसला होता. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या मेढ्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडला. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुंडलिक दुधवडे शेतात गेले असता त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आत बिबट्या पडला असल्याचे त्यांना दिसले. ही माहिती त्यांनी सावरगाव तळचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना दिली. वनविभागास बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच तेथे वनपाल आर. बी. माने, वनरक्षक सुभाष अडांगळे दाखल झाले. विहिरित पिंजरा सोडून बिबट्यास सुखरूप बाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाºयांना उपसरपंच शिवनाथ नेहे, तंटामुक्ती अध्यक्ष परशराम नेहे, संयुक्त वनकमिटी अध्यक्ष दशरथ गाडे आदींनी सहकार्य केले.