रक्तदान करून केले नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:25+5:302021-01-03T04:22:25+5:30

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सुनील त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. ...

Welcome New Year by donating blood | रक्तदान करून केले नववर्षाचे स्वागत

रक्तदान करून केले नववर्षाचे स्वागत

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सुनील त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, ‘‘२०२० हे वर्षे केवळ कोरोनाची ओळख करून देणारे ठरले. सण, उत्सवाबरोबरच विविध उपक्रमांवर निर्बंध आले होते. कोरोना काळात रक्तदान घटल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे अशा रक्तदान शिबिरांची गरज आहे. नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व जपावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी फुलसौंदर यांनी महासंघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिर यशस्वीतेसाठी बापू गायकवाड, अदिनाथ गायकवाड, दिलीप गायकवाड, गणेश गायकवाड, दिनेश गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले.

फोटो ०२ शिबिर

ओळी- बाराबलुतेदार महासंघाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

Web Title: Welcome New Year by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.