मनसे सोबत आल्यास स्वागतच, पण एकच अट; प्रवीण दरेकरांची खुली ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 20:03 IST2020-03-01T19:55:26+5:302020-03-01T20:03:50+5:30
हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

मनसे सोबत आल्यास स्वागतच, पण एकच अट; प्रवीण दरेकरांची खुली ऑफर
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर रविवारी नगर दौºयावर आले होते. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रुपयांची मदत दिली. ही भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शाम पिंपळे आदी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतील निवडणुकीबाबत पत्रकारांनी छेडले असता दरेकर म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायद्याचे समर्थनच केलेले आहे. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला असून, हिंदुत्वाच्या मुद्यावर जे कोणी भाजपसोबत येतील त्यांचे स्वागतच आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले मुंबईतील सुशिक्षित मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सुशिक्षित मतदार भाजपाच्या बाजूने राहिल, असे सूतोवाचही दरेकर यांनी केले.
शिवसेनेच्या सहयोगी अल्पसंख्याक मंत्रीनवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान डोलावून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केले. महाविकास आघाडीतील आबू आझमी यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत राम मंदिराबरोबरच मशिदीतही जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मशिदीसाठीचे ट्रस्ट स्थापन करण्याचे सूतोवाच केले आहे. महाविकास आघाडीत राम मंदिराबाबत मोठा विसंवाद निर्माण झाला असून, सेनेचा गोंधळ उडालेला दिसतो, अशी टीका दरेकर यांनी केली.
...
..तर बळीराजाचे प्राण वाचले असते
कर्जाला कंटाळून मल्हारी बटुळे या शेतकºयाने आत्महत्या केली. बटुळे यांच्याकडे अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे ११ लाखांचे कर्ज होते. परंतु,सरकारने केवळ दोन लाखांपर्यंतचेच कर्ज माफ केले. सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असता तर बटुळे यांनी आत्महत्या केली नसती. बटुळे यांची आत्महत्या हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.