शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून थोरातांना उमेदवारी दिल्यास स्वागतच : सुजय विखे पाटील

By अण्णा नवथर | Updated: June 7, 2023 13:15 IST

काँग्रेसकडून थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण लोकसभा निवडणूकीत स्पर्धा होईल एवढे निश्चित - विखे पाटील

अहमदनगर: काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास स्वागतच आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास रंजक स्पर्धा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा करत माजीमंत्री थोरात यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून पुढे येत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, की ते एक अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विचार करून काँग्रेसने त्यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. भाजपकडून कोण उमेदवार असेल ते माहित नाही. मात्र काँग्रेसकडून थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण लोकसभा निवडणूकीत स्पर्धा होईल एवढे निश्चित, असे खासदार विखे पाटील म्हणाले.

नगरच्या जातीय दंगलींबाबत काय म्हणाले, विखे पाटीलअहमदनगर जिल्ह्यात जातीय दंगली घडत असून, याबाबत पोलिसांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. मात्र काही लोक बाहेरून येऊन नगरचे वातावरण खराब करत आहेत, अशी टीका खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केली.

लव्ह जिहाद बाबत विखे म्हणाले..लव्ह जिहाद सारख्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्याची लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही तर, ती सर्वांची जबाबदारी आहे. संबंधित कुटुंबानेही काळजी घेतली पाहिजे, असे खासदार विखे पाटील याबाबत बोलताना म्हणाले. त्या प्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याचा आदेशशहरातील फकीरवाडा येथील मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक झळकविण्याची घटना घडली आहे. या मिरवणूकी वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावयन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, असे खासदार विखे पाटील यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात