आता वीकेंड घरातच : हाॅटेलिंग राहणार घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:03+5:302021-07-01T04:16:03+5:30
अहमदनगर : डेल्टा प्लसमुळे जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवारी सकाळी ...

आता वीकेंड घरातच : हाॅटेलिंग राहणार घरातच
अहमदनगर : डेल्टा प्लसमुळे जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते ४ या वेळेत हॉटेल सुरू असून, शनिवार व रविवारी केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. हॉटेल बंद असल्याने आठवड्याची सुटी नागरिकांना घरातच व्यतीत करावी लागत आहे. पार्सलसेवा हॉटेल चालकांनी सुरू ठेवली आहे; परंतु ही सेवा देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बहुतांश हॉटेल चालकांनी पार्सल देणेही बंद केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. गेल्या वर्षभरापासून बंद असलेले हॉटेल तिसऱ्या लाटेनंतर सुरू करण्यात आले होते; परंतु डेल्टा प्लसमुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिकेने पथकांची स्थापना केली आहे. हॉटेल सोमवार ते शुक्रवार या काळात ५० टक्के क्षमतेसह सकाळी ७ ते ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे, तसेच शनिवारी व रविवारी हॉटेल सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. आठवड्यातील दोन दिवस केवळ पार्सल व घरपोच सेवा देण्यास हॉटेल चालकांना मुभा देण्यात आली आहे. शनिवार व रविवारी हॉटेलमध्ये चांगली गर्दी असते; परंतु हे दोन दिवस हॉटेल बंद ठेवाव्या लागतात. पार्सल सेवा सुरू ठेवणे हॉटेल चालकांना अर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बहुतांश हॉटेल चालकांनी हॉटेल बंद ठेवले असून, हॉटेल चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
..
एकूण हॉटेल- २२५
....
एकूण कर्मचारी
२ हजार ५२५
....
हॉटेल सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू
जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहर व परिसरातील हॉटेल सकाळी ७ ते ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. याशिवाय शनिवार व रविवारी हॉटेल सुरू करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पार्सल व घरोपोच सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
....
जिल्ह्यात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते ४ या वेळेतच हॉटेल सुरू ठेवण्यात येतात. त्यात ५० टक्के क्षमतेची अट असून, यामुळे हॉटेल चालक अडचणीत आले आहेत, तसेच हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेले कामगारही अडचणीत आहेत.
-प्रदीप पंजाबी, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन
.....
दुसऱ्या लाटेनंतर नियम शिथिल करण्यात आल्याने हॉटेल सुरू झाल्या होत्या. ग्राहकही येत होते; परंतु पुन्हा बंद करण्याचे आदेश देण्यात आला. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले असून, कर्जाच हप्ते भरणेही कठीण झाले आहे. हॉटेल चालकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करावे.
-सुनील काळे, हॉटेल व्यावसायिक
..
सूचना : डमी- क्रमांक ८५६