पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकजूट हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:50+5:302021-09-14T04:25:50+5:30

कर्जत : पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांची एकजूट हवी. समाजाची एकीच त्याचे प्रतिनिधित्व करीत असते. त्यामुळे आता खबरीगिरी ...

We need to unite to bring the Pardhi community into the mainstream | पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकजूट हवी

पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकजूट हवी

कर्जत : पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांची एकजूट हवी. समाजाची एकीच त्याचे प्रतिनिधित्व करीत असते. त्यामुळे आता खबरीगिरी बंद करा आणि समाज जागृत करत व्यवसाय उभारून त्याचा विकास साधा, असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले.

कर्जत येथे रिपब्लिकन पार्टी आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे विभाग प्रमुख विनोद भालेराव, कर्जतचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, तालुका उपाध्यक्ष सुभाष साळवे, सरपंच भीमराव साळवे आदी उपस्थित होते.

भटक्या विमुक्त जाती-जमाती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष श्याम भोसले यांनी अनिल भोसले, शोभराज काळे, श्रीकांत भोसले, आयमन काळे, नुरा भोसले, ज्योती भोसले, चेतन भोसले, धनंजय काळे, राजूर चव्हाण, विलास काळे, शुभम भोसले, सुभाष काळे आदींसह रिपाइंमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी ॲड. पी. वी. कोपनर, शरद आढाव, सोहन कदम, शहराध्यक्ष सागर कांबळे, उपाध्यक्ष लखन भैलुमे, रोहिदास आढाव, रमेश आखाडे, धनंजय कांबळे, सचिन कांबळे, देवा खरात, विनोद थोरात, बळी कांबळे, संदीप भैलुमे, बी. जी. भैलुमे, धर्मा चव्हाण, प्रसाद भोसले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे यांनी केले.

---

१४ कर्जत आरपीआय

कर्जत येथील कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी रिपाइंमध्ये प्रवेश केला.

Web Title: We need to unite to bring the Pardhi community into the mainstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.