....तर शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग खडतर!

By Admin | Updated: April 11, 2016 00:32 IST2016-04-11T00:24:49+5:302016-04-11T00:32:48+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. ही संचमान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त राहणाऱ्या जागांवर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

The way of teacher transfers is difficult! | ....तर शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग खडतर!

....तर शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग खडतर!

अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. ही संचमान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त राहणाऱ्या जागांवर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, २० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदलीचा मार्ग आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात साधारण १ हजार ७०० प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात बहुदा नगर जिल्ह्यात इनकमिंग शिक्षकांचे प्रमाण सर्वाधिक राहणार आहे.
राज्य सरकार पातळीवर आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसाठी विशेष निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०७ शिक्षकांना सशर्त आंतरजिल्हा बदलीसाठी ना-हरकत दाखले दिले होते.
त्यानंतर पुन्हा हा विषय थंड झाला आहे. आता पुन्हा या शिक्षकांच्या नजरा २०१५-१६ शिक्षकांच्या संचमान्यतेकडे लागल्या आहेत. या संचमान्यतेनुसार २०० हून अधिक जागा रिक्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यात काही प्रमाणात आंतरजिल्हा बदली शिक्षकांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र, कमी पट असणाऱ्या शाळा बंद केल्यास त्यातून ६२० शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षक चिंतेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा बदलीबाबत मौन बाळगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
संचमान्यतेनंतर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त होणाऱ्या जागांचा तपशील समोर येणार आहे. रिक्त असणाऱ्या जागांची संख्या पाहून वर्षानुवर्षे जिल्ह्याबाहेर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्यासाठी पुढाकार घेवून परजिल्ह्यात नोकऱ्या करणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यात आणणे, त्यांचा हक्क आहे. त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी पुढाकार घेऊ .
-अण्णासाहेब शेलार,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.

Web Title: The way of teacher transfers is difficult!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.