मुळा धरणाचा उजवा कालवा बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:13 IST2021-02-19T04:13:45+5:302021-02-19T04:13:45+5:30
मुळा धरणात सध्या २१००० दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात ...

मुळा धरणाचा उजवा कालवा बंद होण्याच्या मार्गावर
मुळा धरणात सध्या २१००० दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. पहिल्या आवर्तनाच्या माध्यमातून ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. उजव्या कालव्या खालील क्षेत्रातील पिके पाण्याने भरण्याच्या अंतिम अवस्थेत आहे. त्यामुळे लवकरच उजवा कालवा बंद होण्याची चिन्हे आहेत. उजव्या कालव्यातून तीन हजार ८०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. डावा कालवा गेल्या महिन्यात बंद झाला. डाव्या कालव्यातून ३८५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला. डाव्या कालव्यात खालील पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुळा धरणातून आणखी उन्हाळ्यात दोन आवर्तन शेतीसाठी मिळणार आहेत.
.............
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ३८०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. आणखी सर्वसाधारण तीन दिवस पाण्याचे आवर्तन सुरु राहण्याची शक्यता आहे. रब्बीसाठी आणखीन दोन आवर्तन मिळतील.
- अण्णासाहेब आंधळे,
मुळा धरण अभियंता