शहरातील पाणीपुरवठा विस्क्ळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST2021-02-15T04:20:01+5:302021-02-15T04:20:01+5:30
अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवरील मुळा पाणी उपसा केंद्रातील विद्युत पंप रविवारी सायंकाळी नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे ...

शहरातील पाणीपुरवठा विस्क्ळीत
अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवरील मुळा पाणी उपसा केंद्रातील विद्युत पंप रविवारी सायंकाळी नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे मुळा धरणातून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्क्ळीत झाला आहे.
शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मुळा धरणातून पाणी उपसा करण्यासाठी विद्युत पंप आहेत. एक विद्युत पंप नादुरुस्त झाला. दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. परंतु, दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याने सोमवारी ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, अशा भागात पाणीपुरवठा होणार नाही. सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील झेंडी गेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरूडगाव रोड, सावेडी, पाईप लाईन रोड या भागास पाणीपुरवठा होत असतो. तो होणार नाही. तसेच मंगळवारी स्टेशन रोड, विनायक नगर, सावेडी उपनगर, बालिकाश्रम रोड आदी भागास पाणीपुरवठा होणार नाही. वरील सर्व भागांना बुधवारी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.