शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जल सुरक्षा व ऊर्जा सुरक्षेने शेतीत समृद्धी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:30 IST

मागेल त्याला ठिबक तसेच तुषार सिंचन व सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज अशी जलसुरक्षा व ऊर्जा सुरक्षा प्रदान केल्याने राज्यात शेती क्षेत्रात समृद्धी आल्याची उत्पादनात माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राहुरी : मागेल त्याला ठिबक तसेच तुषार सिंचन व सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज अशी जलसुरक्षा व ऊर्जा सुरक्षा प्रदान केल्याने राज्यात शेती क्षेत्रात समृद्धी आल्याची उत्पादनात माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ रविवारी आयोजित ३९ व्या पदवीदान समारंभामध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते फडणवीस यांचा डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने गौरव करण्यात आला. समारंभास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आयसीएआरचे निवृत्त संचालक डॉ. अशोक कुमार सिंग, कुलगुरू व्ही. के. खर्चे, कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, नागपूर येथील म्हाफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता साताप्पा खरबडे, दत्तात्रय उगले, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. सचिन नलावडे, सदाशिव पाटील, स्वाती निकम  खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने २२ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवली. भारत सरकारने आपल्या अहवालामध्ये या गावांमध्ये पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले. हवामानातील बदल हे राज्यातील शेतकऱ्यांपुढील सर्वात मोठे संकट आहे. यंदाही कमी पाऊसमानाचा अंदाज आहे. अशावेळी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. जैवतंत्रज्ञानाद्वारे प्रतिकूल हवामानात तग धरू शकतील असे वाण विकसित करणे ही विद्यापीठांसमोरील जबाबदारी आहे.    अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक शेततळे 

मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जिरवल्याने फळ उत्पादनात राज्याने प्रगती केली. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये १६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती वर्षाअखेरीस होणार आहे. शेतकऱ्यांना त्यातून दिवसा १२ तास मोफत वीज मिळू शकेल, असे फडणवीस म्हणाले.

राज्यपाल वर्मा म्हणाले, भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधीष्टीत उपाय, स्टार्टप्स, कृषी उद्योग व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतीमध्ये दडलेले आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही तर ग्रामीण समाज उन्नतीसाठी व्हावा.  कृषिमंत्री भरणे यांनी विद्यार्थ्यांना केवळ नोकरीमागे न लागता उद्योग, व्यवसाय उभारण्याचे आवाहन केले.

महाविस्तार एआय एप

राज्य सरकारने कृषी क्षेत्रात महाविस्तार एआय एप तयार केले आहे. ३० लाख शेतकऱ्यांना त्यात जोडण्यात आले आहे. हवामान अंदाज, किड नियंत्रण यावर शेतकऱ्यांना ॲपद्वारे मार्गदर्शन केले जाते. मुंबईत झालेल्या एआय शिखर संमेलनात राज्याला शेती क्षेत्रातील एआय वापराच्या सादरीकरणाची संधी मिळाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Water, Energy Security Bring Prosperity to Farming: CM Fadnavis

Web Summary : CM Fadnavis highlighted that water and energy security, through drip irrigation and solar power, have brought prosperity to Maharashtra's agriculture. He spoke at Mahatma Phule Agricultural University, emphasizing technology's role in tackling climate change and the success of initiatives like Jalyukt Shivar.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahuriराहुरीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी