जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी टंचाई
By Admin | Updated: July 1, 2014 00:14 IST2014-06-30T23:22:55+5:302014-07-01T00:14:35+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६६८ प्राथमिक शाळा आहेत. यातील बहुतांशी ठिकाणी पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी टंचाई
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६६८ प्राथमिक शाळा आहेत. यातील बहुतांशी ठिकाणी पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. या प्राथमिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.
जून महिना संपत आला असून सध्या २३५ गावे आणि १ हजार वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यातील बहुतांशी गावात आणि वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. लवकर पाऊस न झाल्यास या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जिल्ह्यातील टँकरचा आकडा ३०० च्या पुढे गेला असून त्यातून ५ लाख ३० हजार ८३७ लोकांची तहान भागविली जात आहे.
१६ जूनला प्राथमिक शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या पंधरवाड्यात शिक्षकांना शाळा बाह्य मुलांना शाळेत आणणे, पुस्तके, गणवेश वाटप आदी महत्वाची कामे करावी लागतात. त्याच शाळेत पिण्यासाठी पाणी नसल्याने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
जिल्ह्यात नेमक्या किती शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, याबाबत शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांच्याकडे विचारणा केली असता, ते उपलब्ध झाले नाही. मात्र, शिक्षण विभागाकडे असणाऱ्या माहितीनुसार १५० ठिकाणी पाणी साठवण व्यवस्था नाही. मात्र, जिल्ह्यात सध्या टंचाईची परिस्थिती असल्याने ज्या ठिकाणी उद्भवात पाणी नाही. त्या ठिकाणी यंत्रणा असून देखील पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अशा प्रकारे पाणी नसल्याने टंचाई निर्माण झाली असल्याची कोणतीच माहिती नाही.(प्रतिनिधी)
पदोन्नतीचे वेध
यंदापासून तिसरी आणि चौथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. विद्यार्थ्यी नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तकात रमलेले आहे. शिक्षकांना मात्र पदोन्नतीचे वेध लागलेले आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने पदोन्नत्या पूर्ण करून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
पाऊस लांबल्याने पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. शिक्षण विभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. अवघ्या दीडशे ठिकाणी पाण्याची सुविधा नसल्याची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आहे.
-गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी.