पाणीटंचाईप्रश्नी हंडामोर्चा,ठिय्या

By Admin | Updated: January 12, 2016 23:34 IST2016-01-12T23:28:25+5:302016-01-12T23:34:22+5:30

पाथर्डी : टाळ-मृदुंगाच्या जयघोषात भजन करून तहसीलदार व शासनाचा निषेध करीत ढाकणवाडी येथे टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे, रोजगार हमीची कामे सुरू करावी,

Water scarcity question Handa Marchar, Thayya | पाणीटंचाईप्रश्नी हंडामोर्चा,ठिय्या

पाणीटंचाईप्रश्नी हंडामोर्चा,ठिय्या

पाथर्डी : टाळ-मृदुंगाच्या जयघोषात भजन करून तहसीलदार व शासनाचा निषेध करीत ढाकणवाडी येथे टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे, रोजगार हमीची कामे सुरू करावी, या मागणीसाठी संतप्त महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन ठिय्या दिला. आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे तहसील कार्यालय दणाणून सोडले होते.
पाथर्डी पंचायत समितीे सदस्य देविदास खेडकर, अविनाश पालवे, सरपंच राजेंद्र ढाकणे, नामदेव खेडकर, भरत ढाकणे, कमल ढाकणे, गंगुबाई ढाकणे, साखरबाई ढाकणे, शकुंतला ढाकणे, आसराबाई वारे, भागुबाई बेंद्रे, बाळासाहेब ढाकणे, माणिक ढाकणे, गोरक्ष ढाकणे यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाचा धिक्कार केला. ढाकणवाडी येथे पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे, यासाठी डिसेंबर महिन्यात प्रस्ताव दिला होता. गावात पाणी नसताना अधिकारी टँकर देण्यास टाळाटाळ करतात, असे सांगून सरपंच राजेंद्र ढाकणे यांनी सोमवारी ढाकणवाडी ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. उपोषणाकडे तलाठी वगळता कोणताही अधिकारी फिरकला नाही. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाचा धिक्कार केला. आंदोलनापूर्वी पाच मिनिटे अगोदरच तहसीलदार कार्यालयाबाहेर निघून गेल्या.या घटनेचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. (तालुका प्रतिनिधी)
तहसीलदारांचा काढता पाय
रोजगार हमीचे अव्वल कारकून राजेंद्र कळसकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. सहायक गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी ढाकणवाडीत रोजगार हमीचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले. तहसीलदार सुनीता जऱ्हाड आंदोलन सुरू होण्यापूर्वी कार्यालयातून निघून गेल्या. तहसीलदारांनी आंदोलनाचा धसका घेत निघून गेल्या. अशा अधिकाऱ्यांचा निषेध करतो, असे ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय
आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. पाणी टंचाईमुळे होणारे हाल सांगून गावाला टँकर सुरु होण्यास होणाऱ्या दिरंगाईबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. या महिला रिकामे हंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Water scarcity question Handa Marchar, Thayya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.