बोल्हेगाव फाटा येथे पाणी टंचाई
By Admin | Updated: May 25, 2014 00:31 IST2014-05-24T23:56:37+5:302014-05-25T00:31:51+5:30
अहमदनगर : बोल्हेगाव फाटा येथील मनोलीला नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

बोल्हेगाव फाटा येथे पाणी टंचाई
अहमदनगर : बोल्हेगाव फाटा येथील मनोलीला नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सोडण्यात येणारे पाणी कमी दाबान येते, पाणी सोडण्याची वेळ अनियमित असल्याची नागरिकांची तक्रार आहे. बोल्हेगाव फाटा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असला तरी या ठिकाणी महापालिकेचे दुर्लक्ष आहे. विशेष करून उन्हाळ्याचे दिवस असतांना अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी पाणी सोडणार्या कर्मचार्यांनी जाणीवपूर्वक काही विशिष्ट भागात वीज खंडित झाल्यावर पाणी सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पाणी सोडणार्या कर्मचार्याची अन्य भागात बदली केल्यानंतर पुन्हा तेच कर्मचारी या ठिकाणी बदली करून येत आहेत. (प्रतिनिधी) सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापर वाढलेला आहे. नागरिकांना या ठिकाणी पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने महापालिकेने पुरेशा प्रमाणात पाणी सोडावे. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहे. मनपा आयुक्त यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. -दीपक तोडमल, नागरिक