अण्णांच्या भेटीसाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन पुन्हा राळेगणमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 11:38 IST2018-09-26T11:38:04+5:302018-09-26T11:38:21+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अण्णांच्या भेटीसाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन पुन्हा राळेगणमध्ये
राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात डॉ.गिरीष महाजन यांनी राळेगण सिध्दीमध्ये येऊन अण्णा हजारे यांची भेट घेत चर्चा केली होती. मात्र या चर्चेनंतरही अण्णा आंदोलनावर ठाम आहेत.
त्यामुळे आज पुन्हा एकदा उपोषणाला काही दिवसांचाच अवधी बाकी असताना राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन आज राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. अण्णांचे मन वळविण्यासाठी महाजन पुन्हा एकदा शिष्टाई करणार आहेत. डॉ. महाजन हे राज्य सरकार व केंद्र सरकारचे दूत म्हणून हजारे यांच्याशी ते संपर्कात होते.