शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरी चारीसाठी पाणी सोडले; ओव्हरफ्लोने भरणार बंधारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:44 IST

मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते सोडण्यात आले़ ओव्हरप्लोने कार्यक्षेत्रातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत.

राहुरी : मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते सोडण्यात आले़ ओव्हरप्लोने कार्यक्षेत्रातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू असून धरणाकडे १४०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.गुरूवारी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुळा धरणावर जाऊन कळ दाबली़. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपअभियंता सायली पाटील, अभियंता पी़पी़ तनपुरे उपस्थित होते़.मुळा धरणात सध्या २६ हजार दलघफू पाणीसाठा आहे़. कोतूळ येथून १४०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़. मुळा नदी पात्रातून ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे सुरू आहे़. डाव्या कालव्यातून ३० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़. उजव्या कालव्यातून शेतीसाठी ६०० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़. मुळा धरणाच्या पाणलोट व लाभ क्षेत्रावर गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़. तुरळक स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली़ परतीचा पाऊस ९ नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावण्याची शक्यता आहे़. दोन्ही कालवे व नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावण्यास मदत झाली आहे़. पंधरा दिवस पाण्याची आवक सुरू राहाण्याची शक्यता आहे़. ढगाळ हवामान व पडणा-या पावसामुळे बाजरी, कपाशी, सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे गणित धोक्यात आले आहे़.मुळा धरणातून वांबोरी चारीखाली असलेले बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरण्यात येणार आहेत. वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे़. वांबोरी चारीसाठी ६८० दलघफू पाणी मंजूर आहे़. सध्या सोडण्यात आलेले पाणी राखीव पाण्याव्यतिरिक्त आहे़. पाणलोट क्षेत्रावर यंदा समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे़. त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़, असे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.    

टॅग्स :Rahuriराहुरीwater shortageपाणीकपात