कर्जत, राशीनवर जलसंकट
By Admin | Updated: July 16, 2014 00:45 IST2014-07-15T23:31:09+5:302014-07-16T00:45:10+5:30
कर्जत : कर्जत, राशीनला पाणी पुरवठा करणाऱ्या दूरगाव, थेरवडी तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या गावांवर पाणी टंचाईचे संकट आहे.
कर्जत, राशीनवर जलसंकट
कर्जत : कर्जत, राशीनला पाणी पुरवठा करणाऱ्या दूरगाव, थेरवडी तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या गावांवर पाणी टंचाईचे संकट आहे.
कर्जत तालुक्यात चाळीस टँकरव्दारे ३७ गावे व १५८ वाड्या, वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पातळी खालावत चाललेले उद्भव, वीज समस्या यामुळे टँकरच्या मंजूर खेपा नियमित होण्यास अडचणी येत आहेत. टँकर मंजूर करताना प्रशासन सन २००१ ची लोकसंख्या गृहित धरते. प्रत्यक्षात लोकसंख्या याहून अधिक आहे.
उद्भव कोरडा पडल्याने कर्जतला पाणी पुरवठा करणारी योजना महिनाभरापासून बंद आहे. ग्रामपंचायतीने टाकलेल्या नवीन पाणी योजनेव्दारे सध्या कर्जतला पाणी पुरवठा होतो. थेरवडी तलाव कोरडा आहे. २२ जुलै रोजी गोदड महाराजांची रथयात्रा आहे. यात्रेसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. या भाविकांचा पाणीप्रश्न कसा सोडवावा? हा प्रश्न ग्रामपंचायतीला भेडसावत आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्यांना पाणी पुरवठा करणारे टँकर मालक गेल्या वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. टँकरच्या बिलांचे ३ कोटी ५० लाख रुपये थकले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
कुकडीचे पाणी सोडावे
राशीनला पाणी पुरवठा करणारा थेरवडी तलाव कोरडा आहे. यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे राशीनकरांना पाणी देणे अशक्य होत आहे. कुकडीचे पाण्याने थेरवडी तलाव भरावा.
-मीराबाई देशमुख
सरपंच, राशीन
टँकरची गरज
२२ जुलैपासून कर्जत येथे गोदड महाराजांचा रथयात्रौत्सव आहे. यानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने टँकर वाढवून द्यावे. कुकडीचे पाणी सोडून थेरवडी व दूरगाव तलाव भरावे.
-सुनंदा पवार,
सरपंच, कर्जत