शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:24+5:302021-03-24T04:18:24+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालय, भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २२) ऑनलाइन ...

शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन आवश्यक
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालय, भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २२) ऑनलाइन पद्धतीने जागतिक जल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पौळ बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड होते. भूगोल विभागप्रमुख प्रा.रवींद्र गायकवाड, प्रा.संजय नवले, प्रा.संदीप देशमुख, प्रा.कोमल सिंग, प्रा.विनोद गायकवाड, डॉ.प्रताप फलफले आदी उपस्थित होते.
पृथ्वीवरील सर्वात सुंदर घटक मानव आहे, परंतु मानव हाच निसर्गास घातक ठरत चालला आहे. निसर्गाचा ऱ्हास थांबविण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय स्तरावरून व्यापक प्रमाणात जलसंवर्धन चळवळ निर्माण होऊ शकते. जलव्यवस्थापनाचे नियोजन करताना, त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येऊन भूजल पातळी वाढल्याने दुष्काळाची तीव्रता कमी होईल, असेही डॉ.पौळ म्हणाले.
प्रा.विनोद गायकवाड यांनी आभार मानले.