चोरांच्या भीतिने जागता पहारा
By Admin | Updated: September 25, 2014 00:03 IST2014-09-24T23:55:23+5:302014-09-25T00:03:44+5:30
पारनेर : शंभर, दोनशे जणांची टोळी रात्री येऊन मारहाण करते. ही चोरांची टोळी आहे, अशी अफवा पसरल्याने चोरांच्या भीतिमुळे निघोज, देवीभोयरे, वडझिरेकरांची गेल्या तीन दिवसांपासून झोप उडाली आहे.

चोरांच्या भीतिने जागता पहारा
पारनेर : शंभर, दोनशे जणांची टोळी रात्री येऊन मारहाण करते. ही चोरांची टोळी आहे, अशी अफवा पसरल्याने चोरांच्या भीतिमुळे निघोज, अळकुटी, लोणीमावळा, देवीभोयरे, वडझिरेकरांची गेल्या तीन दिवसांपासून झोप उडाली आहे. या वार्ताहराने सोमवारी रात्री फिरून आढावा घेतला असता ही सर्व गावेच जागी असल्याचे निदर्शनास आले.
पारनेर तालुक्यातील वडनेर, निघोज, अळकुटी, लोणीमावळा, पठारवाडी, वडझिरे ही गावे पुणे जिल्ह्यातील हद्दीनजीक आहेत. पुणे जिल्ह्यातून आळेफाटा, टाकळी हाजी, जांबुत व परिसरात दोनशे ते तीनशे लोकांची टोळी नागरिकांना मारहाण करीत आहे, अशी अफवा पारनेर तालुक्यातील या गावांमध्ये पसरली. गेल्या तीन दिवसांपासून निघोजमधील रसाळवाडी, वडनेर रस्ता, वडगाव गुंड, पांढरकरवाडी परिसरात काही जणांना मारहाण केली, दोन ते तीन जणांनी दुचाकीस्वारांना अडविले, अशाही अफवा पसरल्या. लोणीमावळा, अळकुटी, पाबळ येथे महिलांना मारहाण केल्याचे सांगितले गेले. या अफवा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या. या अफवांमुळे रात्रीच अनेक गावकरी रस्त्यावर उतरले, परंतु काही जणांनी चोर समजून वीटभट्टी कामगारांनाच मारहाण केल्याचे समजते.
(तालुका प्रतिनिधी)