चोरांच्या भीतिने जागता पहारा

By Admin | Updated: September 24, 2014 23:55 IST2014-09-24T23:55:23+5:302014-09-24T23:55:23+5:30

पारनेर : शंभर, दोनशे जणांची टोळी रात्री येऊन मारहाण करते. ही चोरांची टोळी आहे, अशी अफवा पसरल्याने चोरांच्या भीतिमुळे निघोज, देवीभोयरे, वडझिरेकरांची गेल्या तीन दिवसांपासून झोप उडाली आहे.

Watch the thieves fear the thief! | चोरांच्या भीतिने जागता पहारा

चोरांच्या भीतिने जागता पहारा

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात नाशिक पश्चिम मतदारसंघासह इतर मतदारसंघांतील ५० हून अधिक इच्छुकांनी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले होते. यात मनपाच्या उत्पन्नात थकबाकीपोटी पाच कोटी रुपयांची वसुली झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीदारांनी थकबाकी भरावी यासाठी विशेष मोहीम राबविली जाते. यानंतर थकबाकी न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येते; परंतु राजकीय पुढाऱ्यांकडे लाखो रुपयांची थकबाकी असतानाही ती मनपाकडून वसूल होत नसल्याचे चित्र बघावयास मिळते. महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, सर्वच पक्षांच्या व संघटनांच्या इच्छुकांनी मनपाची त्यांच्याकडील थकबाकी भरून ना हरकत दाखला मिळविला आहे. यात नाशिक पश्चिम मतदारसंघातील मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात मतदारसंघासह इतर मतदारसंघांतील सुमारे ५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी ना हरकत दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला होता. यात पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते बबनराव घोलप, समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार नितीन भोसले, आमदार वसंत गिते, रविकिरण घोलप, मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, लक्ष्मण जायभावे, विलास शिंदे, मामा ठाकरे, दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे, सीमा हिरे, जगन पाटील, गोपाळ पाटील, प्रदीप पेशकर, डॉ. डी. एल. कराड, शिरीष कोतवाल, माजी महापौर विनायक पांडे, दशरथ पाटील, नारायण गावित, अजय बोरस्ते यांसह ५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी ना हरकत दाखला घेण्यासाठी अर्ज घेतल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
या इच्छुक उमेदवारांच्या घरपट्टी, पाणीपट्टी व विविध करांच्या थकबाकीपोटी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात दोनच महिन्यांत कोट्यवधी रुपयांची विक्रमी थकबाकी वसूल झाली आहे. मनपाच्या वतीने दरवर्षी थकबाकीदारांना घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी भरण्यासाठी स्मरणपत्रे, नोटिसा बजावण्यात येतात; परंतु यात सर्वसामान्य नागरिकच थकबाकी भरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. राजकीय पुढाऱ्यांकडील थकबाकी ही निवडणूक काळातच वसूल होत असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Watch the thieves fear the thief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.