वारकरी सेवा संघाचा हरिनाम सप्ताह
By Admin | Updated: October 7, 2016 00:49 IST2016-10-07T00:21:30+5:302016-10-07T00:49:13+5:30
अहमदनगर : जिल्हा वारकरी सेवा संघातर्फे अखंर हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद्भागवत कथा सोहळ््याचे १८ आॅक्टोबरपासून आयोजन करण्यात आले आहे.

वारकरी सेवा संघाचा हरिनाम सप्ताह
अहमदनगर : जिल्हा वारकरी सेवा संघातर्फे अखंर हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद्भागवत कथा सोहळ््याचे १८ आॅक्टोबरपासून आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे यंदाचे सोळावे वर्षे असून, या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकारांची हजेरी लागणार आहे, अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. विश्वनाथ महाराज राऊत यांनी दिली.
हा सप्ताह स्टेशन रोडवरील बडीसाजन सांस्कृतिक भवन, सक्कर चौक येथे होणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष पवीण तोगडिया आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते या सप्ताहाच उद्घाटन होणार आहे. याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. शंकर हैबती चौधरी यांना निष्काम कर्मयोगी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. श्रीमद्भागवत कथेचे निरूपण गोविंदशास्त्री जाटदेवळेकर करणार आहेत. या कथेचे उद्घाटन पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
या साप्ताहात नारायण महाराज भडणेकर, संजय महाराज धोंडगे, उत्तम महाराज बडे, समाधान महाराज शर्मा, ज्ञानेश्वर माऊली कदम, बंडातात्या कराडकर, विश्वनाथ महाराज कोल्हे यांची कीर्तने होणार आहेत. पहाटे चार वाजता काकडा भजन, सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी अडीच वाजता भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री आठ वाजता हरिपाठ, असे कार्यक्रम होणार आहेत.