शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला शेती हवी पण शेतकरी नवरा नको..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2023 09:00 IST

मुलाला सरकारी नोकरी हवी, किंवा आयटीत काम करणारा हवा, आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून घरची शेतीही हवी असा अनाठायी हट्ट उपवर मुलींच्या कुटुंबांकडून केला जात आहे. घरची शेती तरी पाहिजे, पण यांना शेतकरी नवरा नको अशी मुली व तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे.

मुलाला सरकारी नोकरी हवी, किंवा आयटीत काम करणारा हवा, आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून घरची शेतीही हवी असा अनाठायी हट्ट उपवर मुलींच्या कुटुंबांकडून केला जात आहे. घरची शेती तरी पाहिजे, पण यांना शेतकरी नवरा नको अशी मुली व तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे. बरं गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारा शेती कधी करेल एवढा सारासार विचार केला जात नाही.

तुळशीच्या लग्नानंतर आता सगळीकडे विवाहाचा धुमधडाका उडालेला आहे, दुसरीकडे अनेक लग्नाळू मुले व मुलींचे विवाह जुळत नाहीत, ही मोठी सामाजिक समस्या बनली आहे. त्यामागे मुलामुलींच्या अनाठायी अपेक्षा हेच महत्त्वाचे कारण आहे. विशेषतः मुलांना या अपेक्षांवर उतरणे आव्हानात्मक झाले आहे.

मुलींपेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढली- आता मुली मुलांच्या बरोबरीने शिकल्या आहेत, पाच आकड़ी पगाराची नोकरी करतात त्यांना मुलगाही आपल्याच तोडीचा किंवा वरचढ हवा असतो.- या अपेक्षांमध्ये जराही तडजोड केली जात नाही. त्यामुळे मुलांची मात्र मोठी अडचण झाली आहे. कितीही चांगले स्थळ असले तरी मुलगी लवकर मिळत नाही.

या मुलांच्या लग्नाची चिंता - खेड्यात राहणारा: शहरी मुलींना शहरात राहायची सवय असते. पण ग्रामीण भागातील मुलींनाही आता शहरात राहायचे आहे. शहरी राहणीमान, तेथील चकाचाँद, सोयीसुविधा हव्या आहेत.- कमी शिक्षित: मुलींचे कमीत कमी शिक्षण आता पदवी- पर्यंतचे आहे. त्यापेक्षा कमी शिकलेली मुलगी मिळणे क्चचितच.- शेतकरी: कुटुंबाची घरची शेती हवी पण मुलाने शेतकरी नव्हे तर नोकरदार असावा.कमी पगार: मुलाला किमान २५-३० हजार पगार हवा अशी ग्रामीण मुलींची अपेक्षा असते. शहरातील कमावत्या मुलींना तर आपल्यापेक्षा जास्त कमावणारा हवा असतो.

अपेक्षांच्या पातळीवर उपवर मुलामुलींनी थोडी तडजोड स्वीकारणे गरजेचे आहे. नुकताच कमवायला लागलेला मुलगा गलेलठ्ठ पगार, स्वतःचा फ्लॅट कसा घेऊ शकेल. सोनं पिकवणारी शेती असेल तर शेतकरी नवरा का नको, नोकरदार हवा असेल तर घरची शेती कशी करेल याचा विचार मुलीच्या पालकांनी केला पाहीजे. - वसंतराव मुळीक, मराठा वधू-वर सूचक केंद्र

टॅग्स :Farmerशेतकरीjobनोकरीfarmingशेतीmarriageलग्न