जगभर योगाचे बीजारोपण करायचे आहे (उपस्थितांच्या नावांची पुनरावृत्ती तपासावी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:31+5:302020-12-13T04:35:31+5:30
नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील मालपाणी हेल्थ क्लब येथे तीन दिवसीय राष्ट्रीय योगासन परीक्षक प्रशिक्षण ...

जगभर योगाचे बीजारोपण करायचे आहे (उपस्थितांच्या नावांची पुनरावृत्ती तपासावी)
नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील मालपाणी हेल्थ क्लब येथे तीन दिवसीय राष्ट्रीय योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ( दि.१२) या कार्यशाळेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगासना स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष, योगमहर्षी स्वामी रामदेव यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
स्वामी रामदेव म्हणाले, योगासनांमुळे देशातील बालकांचे, युवकांचे शरीर, त्यांचे संकल्प पोलादी बनतील. त्यांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सुधारेल. योगामुळे देशाचा चरित्र उंचावेल. प्रास्ताविकात डॉ. मालपाणी म्हणाले, सर्वांच्या प्रयत्नातून योगासनाला खेळ म्हणून मान्यता मिळाली.
फेडरेशनचे महासचिव डॉ. एच. आर. नागेंद्र (गुरुजी) व नॅशनल फेडरेशनचे महासचिव डॉ. जयदीप आर्या आदी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते. नॅशनल योगासना स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. ईश्वर बसवरेड्डी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नॅशनल योगासना स्पोर्ट्स फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य डॉ. निरंजन मूर्ती, पतंजली योग समितीचे महाराष्ट्र समन्वयक भालचंद्र पडाळकर, सतीश मोहगावकर, उमंग द्वान, जयदीप आर्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते. फेडरेशनचे महासचिव तथा एस व्यासा विद्यापीठाचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र (गुरुजी) व नॅशनल फेडरेशनचे महासचिव डॉ. जयदीप आर्या आदी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.