वांबोरी विजेता, भिंगार उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST2021-02-14T04:20:00+5:302021-02-14T04:20:00+5:30

तृतीय बक्षीस स्पर्धेचे नियोजक सुपर किंग्स क्रिकेट क्लब ब्राह्मणी यांनी तर चौथे बक्षीस बारागाव नांदूर तर पाचवे बक्षीस ब्राह्मणी ...

Wambori winner, Bhingar runner-up | वांबोरी विजेता, भिंगार उपविजेता

वांबोरी विजेता, भिंगार उपविजेता

तृतीय बक्षीस स्पर्धेचे नियोजक सुपर किंग्स क्रिकेट क्लब ब्राह्मणी यांनी तर चौथे बक्षीस बारागाव नांदूर तर पाचवे बक्षीस ब्राह्मणी तर सहावे बक्षीस जगदंबा संघ ब्राह्मणी यांनी पटकाविले.

उत्कृष्ट संघ म्हणून एम. आझाद राहुरी व मॅन ऑफ द सिरीज किरण शिर्के यांनी मिळविले. खेळाडूंना सर्वतोपरी मदत करू, असे प्रतिपादन युवा नेते हर्ष तनपुरे यांनी केले.

ब्राह्मणी क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे संचालक रंगनाथ मोकाटे हे होते. यावेळी संतोष आघाव, डॉ. राजेंद्र बानकर, प्रा. विश्वनाथ हापसे, साहेबराव चौधरी, सोमनाथ हापसे, पोपट मोकाटे, बाळासाहेब म्हसे, महेश हापसे, सचिन ठूबे, गौरव हापसे, विकास तारडे, अजित मोकाटे, शांताराम हापसे, दीपक हापसे, पठाण, रावसाहेब शिंदे, रमेश हापसे सर , सुरेश नगरे, सुरेश हराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार निखिल हापसे यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार गणेश हापसे यांनी केले. क्रिकेट स्पर्धा म यशस्वीतेसाठी सुपर किंग्ज क्रिकेट क्लबचे निखिल हापसे, विशाल नगरे, गणेश इथापे, चंद्रकांत कारभार, आदिनाथ हापसे, भारत पुंड, अभय हापसे, आदिनाथ हापसे, प्रफुल्ल हापसे, विकास ईथापे, धनंजय आवारे, सोमनाथ नगरे, सागर हापसे परिश्रम घेतले.

Web Title: Wambori winner, Bhingar runner-up