वांबोरी चारी टप्पा दोनचे काम दाेन महिन्यात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:19+5:302021-08-13T04:25:19+5:30
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचा आढावा घेऊन दोन महिन्यात प्रत्यक्ष ...

वांबोरी चारी टप्पा दोनचे काम दाेन महिन्यात सुरू
करंजी : पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचा आढावा घेऊन दोन महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार आहे. या कामास निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. गर्भगिरी डोंगराच्याकडेने थेट मुळा धरणातून लोखंडी पाईपलाईनच्या सहाय्याने या भागातील पाझर तलावात पाणी सोडण्याची ही योजना आहे. या योजनेचा या भागातील शेतीला उपयोग होऊन पिण्याच्या पाण्यावरही मात करता येईल. कोल्हार, चिचोंडी, शिराळ, डमाळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, धारवाडी, लोहसर, खांडगाव, वैजूबाभूळगाव, भोसे, दगडवाडी, करंजी आदी गावांचा या योजनेत समावेश आहे. ५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या वांबोरी चारीच्या या लढ्याला मंत्री तनपुरे यांच्यामुळे यश आले. आता पुढील पाठपुरावाही त्यांच्या नेतृत्वाखालीच सुरू आहे.
या शिष्टमंडळात माजी सभापती संभाजीराव पालवे, जालिंदर वामन, अशोक टेमकर, भाऊसाहेब क्षेत्रे, सतीश क्षेत्रे, प्रतीक घोरपडे, राजू मरकड, तुळशीदास शिंदे आदी सहभागी झाले होते.
---
मंत्री प्राजक्त तनपुरे हे अभ्यासू व हुशार आहेत. ५० वर्षाच्या लढ्याला अखेर त्यांच्या हाताने यश आले. या भागातील शेतकरी त्यांना कधीही विसरणार नाही. यामुळे मी आनंदी झालो.
-बबनराव ढाकणे,
माजी केंद्रीय मंत्री
---
तनपुरे यांनी या योजनेसाठी मनापासून व प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या योजनेचा शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यास मदतच होईल.
-जालिंदर वामन
---
१२ वांबोरी चारी
पाथर्डी तालुक्यातील शिष्टमंडळाने मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी राज्यंमत्री प्राजक्त तनपुरे व इतर.