वाळकी येथे घराची भिंत पडून एक ठार

By Admin | Updated: May 20, 2016 00:29 IST2016-05-20T00:20:04+5:302016-05-20T00:29:40+5:30

अहमदनगर/श्रीगोंदा : तालुक्याच्या अनेक भागात गुरुवारी दुपारी वादळ-वारा सुटला. यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. नगर तालुक्यातील वाळकी येथे घराची भिंत अंगावर पडल्याने किसन घोडके यांचा मृत्यू झाला.

A wall collapsed in a wreck and killed one | वाळकी येथे घराची भिंत पडून एक ठार

वाळकी येथे घराची भिंत पडून एक ठार

अहमदनगर/श्रीगोंदा : तालुक्याच्या अनेक भागात गुरुवारी दुपारी वादळ-वारा सुटला. यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. नगर तालुक्यातील वाळकी येथे घराची भिंत अंगावर पडल्याने किसन घोडके यांचा मृत्यू झाला.
या वादळात जनावरांच्या छावण्यांचेही मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या या वादळाने शेतकरी, नागरिकांनी एकच धांदल उडाली. अनेक घरांचे पत्रे उडाले. नगर तालुक्यात वाळकीसह परिसरात वादळाचा जोराचा तडाखा बसला. वाळकी येथे याच वादळात एका घराची भिंत कोसळली. या भिंतीच्या शेजारी उभ्या असलेल्या किसन घोडके यांच्या अंगावर भिंत कोसळली. त्यात ते गंभीर जखमी होवून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण व परिसरातील कोथूळ, पिसोरे खांड या गावांना गुरूवारी पाच वाजण्याच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. यामध्ये दहा ते बारा घरांवरील पत्रे उडाले. अनेक फ्लेक्स वादळाने रस्त्यावर आले. वादळामुळे विजेचे खांब, मोठे वृक्ष कोसळले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काष्टी येथील बंडू पाचपुते यांच्या घरासमोरील झाड पडले. ढोकराई येथे संतोष गुंड यांच्या अंगणातील विजेचा खांब पडला. तहसीलदार वंदना खरमाळे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Web Title: A wall collapsed in a wreck and killed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.