सुरक्षा रक्षकांना वॉकीटॉकी संच

By Admin | Updated: January 14, 2016 23:02 IST2016-01-14T22:38:25+5:302016-01-14T23:02:44+5:30

सोनई : देशातील विविध ठिकाणच्या देवस्थानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांकडे असलेले वॉकीटॉकी संच अपुरे आहेत.

Walkie talkie set for security guards | सुरक्षा रक्षकांना वॉकीटॉकी संच

सुरक्षा रक्षकांना वॉकीटॉकी संच

सोनई : देशातील विविध ठिकाणच्या देवस्थानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांकडे असलेले वॉकीटॉकी संच अपुरे आहेत. सर्व सुरक्षा रक्षकांना हे संच उपलब्ध व्हावेत, अशी मागणी सुरक्षा रक्षकांनी केली. नव्या विश्वस्तांनी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी देवस्थानमध्ये पहिली बैठक घेतली. त्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पहिल्यांदा नव्या विश्वस्तांनी ३५० कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली. तीन टप्प्यात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अभियंता, आस्थापना आदी विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत देवस्थानच्या ग्रामीण रुग्णालयासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बैठकीस बोलाविण्यात येणार असून त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली जाणार आहे.
देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त दीपक दरंदले, भागवत बानकर, बापूसाहेब शेटे, डॉ. रावसाहेब बानकर, अप्पासाहेब शेटे, योगेश बानकर, वैभव शेटे,
आदिनाथ शेटे, महिला विश्वस्त शालिनी लांडे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, देवस्थानचे व्यवस्थापक संजय बानकर बैठकीस उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Walkie talkie set for security guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.