निळवंडेला मान्यतेची प्रतीक्षा

By Admin | Updated: July 4, 2014 01:22 IST2014-07-04T01:20:09+5:302014-07-04T01:22:09+5:30

अकोले: उत्तर नगर जिल्ह्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.

Wait for Nilvandela to accept it | निळवंडेला मान्यतेची प्रतीक्षा

निळवंडेला मान्यतेची प्रतीक्षा

अकोले: उत्तर नगर जिल्ह्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. अद्याप धरणास केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळालेली नसली तरी शासनाने कागदपञांची पूर्तता केली असून लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
गेली चार दशके निळवंडे धरणाच्या निर्मितीचा घाट सुरु असून १९९० साली धरणाच्या भिंतीची पायाभरणी झाली. मूळ ४७ कोटीच्या धरणाची किंमत आज दोन हजार कोटींवर गेली आहे. आता या प्रकल्पाच्या भिंतीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. निमिर्तीच्या या काळात १०५ वेळा प्रकल्पग्रस्तांनी धरण काम बंद आंदोलने केली. तसेच उंचावरील कालव्यांसाठी आंदोलने झाली. दरम्यान काम पूर्णत्वाकडे जात असले तरी धरणास केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळालेली नाही. १७ प्रकारच्या कादपञांची आवश्यकता असून अद्याप तीन कागदपञांची पूर्तता बाकी आहे. ती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)
निळवंडे धरणास केंद्रीय जल आयोगाची मान्यता अद्याप मिळाली नाही. कागदपञांची पूर्तता होत असून मान्यतेची प्रतिक्षा आहे. कॉस्ट आॅफ इस्टीमेट, इरिगेशन प्लॅनिंग व कन्स्ट्रक्शन मशिनरी या तीन विभागांचे ना हरकत प्रमाणपञ मिळणे अद्याप बाकी आहे. - एन. एल. सावळे, अधीक्षक अभियंता
धरणाच्या भिंतीचे काम ९८ टक्के झाले आहे. पाऊस पडल्यास यावर्षी साडेसहा, तर पुढील वर्षीपासून पूर्ण क्षमतेने ८.३२ टी.एम.सी. इतके पाणी साठविले जाईल
- सुनिल प्रदक्षिणे, कार्यकारी अभियंता, निळवंडे प्रकल्प

Web Title: Wait for Nilvandela to accept it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.