वडनेर बुद्रुकला शेताच्या बांधावरच स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:54+5:302021-08-22T04:25:54+5:30
निघोज : वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) येथील स्वराज्य युवा मंचाचे अध्यक्ष गणेश शेटे यांनी काही सहकाऱ्यांसमवेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ...

वडनेर बुद्रुकला शेताच्या बांधावरच स्वातंत्र्यदिन साजरा
निघोज : वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) येथील स्वराज्य युवा मंचाचे अध्यक्ष गणेश शेटे यांनी काही सहकाऱ्यांसमवेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शेताच्या बांधावरच राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी जय जवान जय किसानचा नारा देण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वारकरी संप्रदायाचे बाळासाहेब वाजे, गणेश शेटे, अक्षय वाजे, दिनेश वायदंडे, रमेश शेटे, विशाल जगदाळे, आदिनाथ चौधरी, सौरभ लोखंडे, सोपान चौधरी, अभिजित वाजे, शुभम जगदाळे, साहिल वाजे, सुजल वाजे, ओम गायकवाड, वंदन वराळ, कृष्णा वाजे, विराज शेटे, रियांश शेटे, सीताबाई शेटे, ललिता वाजे, सुषमा शेटे, उज्ज्वला शेटे, सिद्धी वाजे, ज्ञानेश्वरी वाजे, भक्ती वाजे, नम्रता वाजे, परीक्षा शेटे आदी उपस्थित होते.
----
२१ निघोज
वडनेर बुद्रुक येथे शेताच्या बांधावर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.