मतदान झाले विसापुरात चर्चा फक्त निकालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST2021-01-18T04:19:08+5:302021-01-18T04:19:08+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर परिसरातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकी शुक्रवारी पार पडल्या. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. निकालाबाबत ...

Voting was held in Visapur only for the result | मतदान झाले विसापुरात चर्चा फक्त निकालाची

मतदान झाले विसापुरात चर्चा फक्त निकालाची

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर परिसरातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकी शुक्रवारी पार पडल्या. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. निकालाबाबत पैजा लावल्या जात आहेत.

प्रत्येक गावातील कट्ट्यावर, टपऱ्या, हॉटेल येथेही केवळ निवडणूक कोण येणार याबाबतच चर्चा सुरू आहे. विसापूर ग्रामपंचायतीची निवडणूक या टप्प्यात नव्हती. मात्र, परिसरातील गावांचे केंद्रस्थानी असल्याने सर्व चर्चा विसापूर स्टेशन रस्त्यावरच रंगतात. परिसरातील मुंगुसगाव, सुरेगाव, उख्खलगाव, चांभुर्डी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण, निंबवी, कोंडेगव्हाण, एरंडोली आदी गावच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या ठिकाणी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते गुलाल आमचाच असे ठामपणे सांगत आहेत.

सोशल मीडियावर आपलेच उमेदवार कसे निवडून येतील? कोणामुळे कोण लीड घेणार? आतून आपल्याला कोणी मदत केली? त्यामुळे उमेदवार कसा जिंकणार? हेही सध्या प्रसिद्ध केले जात आहे. या भागात निकालाबाबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या पैजा लावल्या जात आहेत. एवढेच नव्हे, तर मतदान झालेल्या ग्रामपंचायतच्या राजकीय पार्श्वभूमी, तसेच निकालाबाबत स्थिती सर्वच लोक जाणून घेत आहेत. याबरोबरच कोणत्या गावात कोण जिंकणार? हे विस्ताराने सांगत आहेत.

Web Title: Voting was held in Visapur only for the result