मर्चंटच्या पाच जागांसाठी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:17+5:302021-06-26T04:16:17+5:30

श्रीरामपूर : येथील मर्चंटस् असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या पाच जागेसाठी १ ऑगस्टला मतदान होणार आहे. लॉकडाऊनमुळे निवडणूक अधिकारी ॲड. प्रकाश ...

Voting for Merchant's five seats | मर्चंटच्या पाच जागांसाठी मतदान

मर्चंटच्या पाच जागांसाठी मतदान

श्रीरामपूर : येथील मर्चंटस् असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या पाच जागेसाठी १ ऑगस्टला मतदान होणार आहे. लॉकडाऊनमुळे निवडणूक अधिकारी ॲड. प्रकाश बोकडिया यांनी निवडणूक कार्यक्रमास यापूर्वी स्थगिती दिली होती. व्यापारी असोसिएशनचे अमोल कोलते, विलास बोरावके, प्रवीण गुलाटी, विद्यमान अध्यक्ष विशाल पोफळे व वैभव लोढा हे पाच संचालक निवृत्त होत आहेत. मतदारयादी ५ जुलैला प्रसिध्द केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे तसेच छाननी हे कार्यक्रम ८ व १२ जुलैला पार पडतील. १५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दुसऱ्या दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होईल. २ ऑगस्टला सकाळी १० वाजता संस्थेच्या मंगल कार्यालयात मतमोजणी होणार असल्याचे ॲड. प्रकाश बोकडिया यांनी सांगितले.

Web Title: Voting for Merchant's five seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.