मतदान यंत्रे तामिळनाडू-पश्चिम बंगालमध्ये पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:14+5:302020-12-16T04:36:14+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेली १३ हजार मतदान यंत्रे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात येणार ...

मतदान यंत्रे तामिळनाडू-पश्चिम बंगालमध्ये पाठविणार
अहमदनगर : जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेली १३ हजार मतदान यंत्रे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात येणार आहेत. ही मतदान यंत्रांची तपासणी करून ती पाठविण्याची तयारी सुरू झाली असून, एक-दोन दिवसांत ही यंत्रे रवाना होणार आहेत.
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४, तर तामिळनाडूमध्ये राज्य विधानसभेच्या २३४ जागा आहेत. या जागांसाठी २०२१ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यातून मतदान यंत्रे मागविण्यात आली आहेत. नगर जिल्ह्यातूनही तब्बल १३ हजार ७५० मतदान यंत्रे पाठविण्यात येणार आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर यंत्रांची तपासणी, पॅकिंग करण्याचे काम सध्या सुरू असून, दोन दिवसांत ही यंत्रे रवाना होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेेंद्र पाटील यांनी सांगितले.
---
रवाना होणारी मतदान यंत्रे
तामिळनाडूसाठी जाणारी यंत्रे
बॅलेट युनिट-१३२०
कंट्रोल युनिट-४०७०
व्हीव्हीपॉट-३९५०
पश्चिम बंगालसाठी जाणारी यंत्रे
व्हीव्हीपॉट- ४४००
एकूण यंत्रे-१३७५०
---
फोटो - व्होटिंग मशीन