नगर जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:33+5:302021-02-05T06:33:33+5:30
१५ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती ...

नगर जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर
१५ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी, १ मार्चला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रामाणित करुन प्रसिद्ध करणे, तर ८ मार्चला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे असा २२ दिवसाचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नगरपंचायत, नगरपरिषदांना दिले आहेत.
मतदार याद्या प्रसिद्ध करताना निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामध्ये मतदार यादी प्रसिद्ध करताना दुबार नावे वगळणे, रहिवास सोडून गेलेल्याची नावे वगळणे, विधानसभा निहाय मतदार आहेत किंवा नाही याची तपासणी करणे, लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नावे असूनही संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे समाविष्ट करणे आदी सह विविध सूचना करण्यात आल्या आहेत.