माणुसकीचा धर्म सांगणारे विवेकानंद पहिले संन्याशी

By Admin | Updated: December 15, 2015 23:13 IST2015-12-15T22:58:51+5:302015-12-15T23:13:45+5:30

अहमदनगर : स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व ध्यानासक्त बालक, ध्येयासक्त युवक व धर्मासक्त प्रौढ असे होते. परमेश्वराची भेट घ्यायची, या एकाच ध्येयाने विवेकानंद त्यांचे अवघे आयुष्य जगले.

Vivekananda, who preached humanity's religion, | माणुसकीचा धर्म सांगणारे विवेकानंद पहिले संन्याशी

माणुसकीचा धर्म सांगणारे विवेकानंद पहिले संन्याशी

अहमदनगर : स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व ध्यानासक्त बालक, ध्येयासक्त युवक व धर्मासक्त प्रौढ असे होते. परमेश्वराची भेट घ्यायची, या एकाच ध्येयाने विवेकानंद त्यांचे अवघे आयुष्य जगले. मानवता हाच धर्म आहे, अशी शिकवण हिंदू धर्माने दिल्याचे वैश्विक पातळीवर सांगणारे विवेकानंद हे पहिले संन्याशी होते, असे प्रतिपादन अभिनेते व अभ्यासक राहुल सोलापूरकर यांनी केले.
संपदा विद्या प्रतिष्ठानतर्फे सातव्या ज्ञानसंपदा व्याख्यानमालेचा सोमवारी सावेडीत प्रारंभ झाला. या मालिकेतील पहिले पुष्प सोलापूरकर यांनी ‘संन्याशी योध्दा - स्वामी विवेकानंद’ या विषयावर गुंफले. संस्थेचे विश्वस्त मिलींद गंधे यांनी प्रास्ताविक केले. अशोक सोनवणे यांनी वक्त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर यांनी परिचय करून दिला. उज्वला पंडित यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण बजाज, उपाध्यक्ष भगत, मानद सचिव अरूण कुलकर्णी, स्कूल कमिटी चेअरमन कारभारी भिंगारे, अविनाश बोपर्डीकर, विनोद बजाज, श्रीहरी टिपुगडे आदी उपस्थित होते.
सोलापूरकर म्हणाले, बालवयात सवंगड्यांना खेळ म्हणून ध्यान लावू म्हणणाऱ्या नरेंद्राने त्या वयात माणसासारख्या हाडामांसाच्या परमेश्वराला भेटण्याचा ध्यास घेतला. साक्षात काली मातेच्या दर्शनानंतर गुरू आज्ञेनुसार हिंदुस्थानची परिक्रमा केली.
या परिक्रमेत त्यांना दरिद्री नारायणाचे दर्शन घडले. पदवीचे शिक्षण घेताना तत्वज्ञानाचे प्राध्यापक हेस्टिंग्ज यांच्याकडून नरेंद्र यांचा गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याशी परिचय झाला. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला परमेश्वराची प्रथम अनुभूती दिली आणि जीवनाचे उद्दिष्ट समजावून सांगितले. ­
या कालावधीत कुंटुंबाची जबाबदारी असतानाही नरेंद्रांनी काली मातेकडे ज्ञान, वैराग्य व भक्तीची मागणी केली. येथूनच नरेंद्राचा स्वामी विवेकानंदापर्यंतचा प्रवास वेगात सुरू झाला. उज्वला पंडित यांनी आभार मानले. बुधवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजता कवी प्रवीण दवणे यांचे ‘अध्यापन आणि नवर्निमिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Vivekananda, who preached humanity's religion,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.