शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

विठ्ठलनामाने सीताराम गड दुमदुमला

By admin | Updated: October 30, 2023 11:49 IST

खर्डा : सीताराम गडावर समाधी पूजन होऊन मोठा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

खर्डा : स्व. ह.भ.प. सीताराम महाराज उंडेगावकर यांच्या निधनाला गुरुवारी (११ सप्टेंबर) चौदा दिवस (चौदावा) पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीताराम गडावर समाधी पूजन होऊन मोठा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी गड परिसर ‘विठ्ठलनाम.. सीताराम नामाने’ दुमदुमून गेला होता. सकाळी समाधी पूजन झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मंझरीकर (बीड) यांचे कीर्तन झाले. कीर्तन सोहळ्यानंतर चौदा ब्रह्मचारी वृद्धांची पूजा झाली. या ब्रह्ममुर्तीमध्ये गुलाब महाराज खालकर आर्वी (पुणे), लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर, ता.पाटोदा, जि.बीड), किसन महाराज पवार (पंढरपूर), बबन महाराज बहिरवाल (कडा), परमेश्वर महाराज बोधले (डिकसळ, जि. उस्मानाबाद), भक्तीदास महाराज शिंदे (चऱ्हाटा, जि.बीड), उत्तम महाराज वराट (पिंपळवंडी, ता.पाटोदा, जि.बीड), हनुमान महाराज मते (दहिफळ, ता.येवला, जि.उस्मानाबाद), कैलास महाराज भोरे (देवदैठण, ता.जामखेड), शेषराव महाराज ऋषिकेश (हिमाचल प्रदेश), विकास महाराज वायसे (लोणी, ता.जामखेड), लोखंडे महाराज (पाटोदा, जि.बीड), नाना महाराज पांडे (पांडा, ता.करमाळा, जि.सोलापूर), ओंकारदास महाराज (आळंदी) यांचे पूजन होऊन संतभोजन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सीताराम गडावर अर्पण व्हॉलंटरी रक्तपेढी, अहमदनगर व शहा रक्तपेढी बार्शी, जि. सोलापूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ३५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. पोलीस, महिला पोलिसांसह महिलांनीही शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान केले.गेल्या तेरा दिवसांपासून सीताराम गडावर कीर्तन, भजन, भागवत कथा व इतर विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. शिर्डी-हैद्राबाद राज्य मार्गावर सीताराम गड येत असल्याने समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे आवर्जुन थांबत होते. सीताराम गडावर बाबांचे फोटो, समाधी सोहळ्याचीे डीव्हीडी, बाबांवरील लेख आदी साहित्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.लक्ष्मण महाराज शिंदे (परभणी), तुकाराम महाराज कुंभार (आळंदी), हरी महाराज गिते (दिघोळकर), नारायण महाराज (आळंदी) तसेच उद्योगपती, नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, वारकरी, भजनी भक्तगणांनी यावेळी हजेरी लावली. सीताराम गडावरील बंदोबस्तासाठी पोलिसांना स्वयंसेवकांनी मदत केली. यावेळी मोठे अन्नदान झाले. उपस्थितांना सीताराम गडाचे वारसदार, मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)देणग्या अन् गुप्तदानहीसीताराम महाराज उंडेगावकर महाराजांच्या श्रध्देपोटी देणगी, गुप्तदान देणारांची संख्या मोठी होती. सीताराम गडाच्या सुशोभिकरणासाठी या देणग्या जमा झाल्या. एक ते दीड लाखाच्या आसपास भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. एक ते दीड कि.मी. अंतराची दर्शन रांग लागली होती. अनेक भाविक पाच तास रांगेत उभे होते. सर्वत्र भावनिक, भक्तिमय वातावरण दिसून आले.